साडेतीन मुहूर्तातील एक मुहूर्त मानल्या गेलेल्या विजयादशमीला एखाद्या नवीन कार्याची सुरुवात करतात.

आजच्या दिवशी सोनं खरेदीला फार महत्त्व आहे.

दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर सोनं खरेदीसाठी ग्राहकांची सोन्याच्या बाजारपेठांत सकाळपासूनच गर्दी पाहायला मिळतेय.

मुंबईत सोन्याचे दर प्रति तोळा 62 हजार 500 रुपयांवर उघडला. काल मुंबईत सोन्याचा भाव प्रति तोळ्याला 62 हजार 400 होता.

दसऱ्याच्या मुहूर्तावर सोन्याचा दर प्रति तोळा 63 हजारांवर जाण्याचा अंदाज होता. मात्र तसं न होता, दर काहीसा स्थिर असल्याचं चित्र आहे.

जळगाव सराफा बाजारात सोने दर 61 हजार 300 रुपयांवर आहे. जीएसटीसह एक तोळे सोन्याचा दर 63 हजार 139 रुपयांवर जातो.

जळगाव सुवर्ण नगरीत गेल्या 48 तासात शुद्ध सोन्यात प्रति तोळा 1000 रुपयांची वाढ झाली आहे.

सोन्याचे दर जरी जास्त असले तरी ग्राहकांचा सोनं खरेदीसाठी उत्साह मात्र प्रचंड आहे.

आजच्या दिवशी सोनं खरेदी करणं शुभ असल्या कारणाने ग्राहक छोट्या-मोठ्या स्वरूपात सोनं खरेदी करतायत.

काही जण गुंतवणूक म्हणून देखील सोन्याची खरेदी करतायत.

एकंदरीतच दसरा असल्याने जळगावसह संपूर्ण देशभरात अनेक ग्राहक सोने खरेदी करत असल्याचं चित्र आहे.