तुळजाभवानी मातेच्या शाकंभरी उत्सवानिमित्ताने रितेश देशमुख आणि जिनिलिया तुळजाभवानीच्या दर्शनाला आले होते.

तुळजाभवानी मातेच्या शाकंभरी उत्सवाला सुरुवात झाली आहे.

तुळजाभवानी मातेच्या शाकंभरी उत्सवानिमित्ताने रितेश देशमुख आणि जिनिलिया तुळजाभवानीच्या दर्शनाला आले होते.

रितेश आणि जिनेलिया देशमुखचा 'वेड' हा सिनेमा आज प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

'वेड' सिनेमात रितेश आणि जेनिलियाचा एक वेगळा अंदाज पाहायला मिळत आहे.

सावनी आणि सत्याच्या अनोख्या प्रेमाची गोष्ट वेड या सिनेमात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

वेड या सिनेमाच्या माध्यमातून जिनिलियाने मराठी सिनेसृष्टीत तर रितेशने दिग्दर्शनात पदार्पण केलं आहे.

रितेश आणि जेनिलियाने या सिनेमाच्या माध्यमातून संगीत क्षेत्रात पदार्पण केलं आहे. त्यांनी 'देश म्युझिक' या नावाचं एक म्युझिक लेबल सुरू केलं आहे.

रितेश आणि जेनिलियाला पाहण्यासाठी तुळजापुरात भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

वेड या सिनेमाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे रितेश म्हणाला आहे.