आर्थिक संकटामुळे श्रीलंकेतील परिस्थिती सध्या बिकट झाली आहे.

एकीकडे राजपक्षे सरकारवर सातत्याने टीका होत आहे आणि आता श्रीलंकेतील जनता रस्त्यावर उतरत आहे.

श्रीलंका क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि महान फलंदाज सनथ जयसूर्याने आपल्या देशातील सध्याच्या परिस्थितीबाबत चिंता व्यक्त केली आहे.

श्रीलंकेतील गंभीर आर्थिक संकटावरुन नागरिक रस्त्यावर उतरले असून सरकारचा निषेध करत आहेत.

आंदोलन करणाऱ्या या नागरिकांना सनथ जयसूर्याने पाठिंबा दिला आहे. देशातील परिस्थिती 'दुर्दैवी' असल्याचं जयसूर्या म्हणाला.

याचवेळी सनथ जयसूर्याने भारताला उल्लेख 'मोठा भाऊ' असा केला आहे. तो म्हणाला की, आमचा शेजारी देश आणि 'मोठा भाऊ' म्हणून भारताने कायमच आमची मदत केली आहे.

आम्ही भारत सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभारी आहोत. आमच्यासाठी देशातील सध्याच्या परिस्थितीत जिवंत राहणं सोपं नाही. आम्ही भारत आणि इतर देशांच्या मदतीने या परिस्थितीतून बाहेर पडण्याची आशा व्यक्त करतो.