आज हैदराबादने पंजाबव विजय मिळवला यावेळी हैदराबादच्या उम्रानची अखेरची ओव्हर पाहण्याजोगी होती.



उम्रानने अखेरची ओव्हर टाकताना एकही धाव न देता तीन फलंदाजांना तंबूत धाडलं. तर एकजण धावचीतही झाला.



उम्रानने सामन्यात चार षटकात 28 धावा देत चार विकेट घेतल्या.



उम्रान सध्या सर्वात वेगवान गोलंदाजी करणारा भारतीय आहे.



मागील वर्षी टी नटराजनची रिप्लेसमेंट म्हणून आलेला उम्रान आता महत्त्वाचा गोलंदाज आहे.



आयपीएलमध्ये 20 वी ओव्हर मेडन टाकणाऱ्यांच्या यादीत इरफान पठाण असून त्याने 2008 मध्ये ही कामगिरी केली होती.



2009 मध्ये लसिथ मलिंगानेही अशी कामगिरी केली होती.



तर 2017 मध्ये जयदेव उनाडकटने ही कामगिरी केली आहे.