हैदराबादने आधी भेदक गोलंदाजी आणि नंतर दमदार फलंदाजी करत सात विकेट्सनी पंजाबवर विजय मिळवला पंजाबचा लियाम सोडता सर्व खेळाडू खराब कामगिरी केली. लियामने 60 धावा केल्या. पंजाबकडून राहुल चाहरने दोन तर रबाडाने एक विकेट घेतली. हैदराबादची पहिली विकेट कर्णधार विल्यमसनच्या (3) रुपात स्वस्तात गेली. दुसरीकडे हैदराबादची गोलंदाजी पाहता त्यांच्या उम्रान मलिकने आज कमालच केली. राहुल त्रिपाठी आणि अभिषेक शर्मा यांनी एक चांगली भागिदारी रचली. त्यानंतर निकोलस पूरन आणि अॅडन मार्करम यांनी अभेद्य अशी नाबाद भागिदारी रचत 152 धावांचे आव्हान 18.5 षटकात पार केले. यावेळी पूरनने नाबाद 35 आणि मार्करमने नाबाद 41 रन ठोकले. हैदराबादच्या या विजयामुळे त्यांना गुणतालिकेत फायदा झाला आहे. या विजयासह हैदराबादने गुणतालिकेत चौथं स्थान मिळवलं आहे.