छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री श्रीजिता डे लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. श्रीजिताने स्वत:चं लग्नसोहळ्याबद्दल चाहत्यांना माहिती दिली आहे. श्रीजिता गेल्या काही दिवसांपासून जर्मनमध्ये राहणाऱ्या मायकल ब्लोम पेपला डेट करत आहे. लग्नाची घोषणा करत श्रीजिता म्हणाली आहे की,माझा वेडिंग गाऊन तयार असून येत्या 1 जुलैला मी लग्न करणार आहे. श्रीजिताच्या लग्नसोहळ्याच्या घोषणेने चाहत्यांना खूपच आनंद झाला आहे. जर्मनी रीती-रिवाजानुसार श्रीजिता आणि मायकलचं लग्न होणार आहे. जर्मनीनंतर गोव्यातदेखील बंगाली रीती-रिवाजानुसार श्रीजिता-मायकलचा शाही विवाहसोहळा पार पडणार आहे. श्रीजिताने लग्नाची घोषणा केल्यापासून चाहते तिच्या लग्नाची प्रतीक्षा करत आहेत. छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत श्रीजिता डेची गणना होते. 'उतरन', 'कसौटी जिंदगी के', 'पिया रंगरेज', नजर, 'लाल इश्क' आणि 'ये जादू है जिन का' सारख्या लोकप्रिय मालिकांमध्ये श्रीजिताने काम केलं आहे.