भोजपुरी अभिनेत्री आकांक्षा दुबेने वयाच्या 25 व्या वर्षी आत्महत्या करत आयुष्य संपवलं आहे. आकांक्षा दुबेच्या निधनाने भोजपुरी मनोरंजनसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. आकांक्षाने बनारस येथील एका हॉटेलमध्ये गळफास घेत आत्महत्या केली आहे. आकांक्षा दुबे हे भोजपुरी मनोरंजनसृष्टीतील एक लोकप्रिय नाव आहे. आकांक्षाला लहानपणापासूनच मॉडेलिंग, डान्स आणि अभिनयाची आवड होती. टिकटॉक आणि इनस्टाग्रामच्या माध्यमातून आकांक्षाला चांगलीच लोकप्रियता मिळाली. आकांक्षाने वयाच्या 17 व्या वर्षी मनोरंजनसृष्टीत पदार्पण केलं होतं. आकांक्षाने खोसारी लाल यादव आणि पवन सिंह यांच्यासह अनेक भोजपुरी सुपरस्टारसोबत काम केलं आहे. आपल्या लेकीने आयपीएस अधिकारी व्हावं, असं आकांक्षाच्या वडिलांचं स्वप्न होतं. भोजपुरी इंडस्ट्रीत काम करताना आकांक्षाला अनेकदा नकाराचा सामना करावा लागला आहे.