मराठी चित्रपट आणि मालिकाच नव्हे तर, हिंदी मनोरंजन विश्वातही आपल्या अभिनयाचा जलवा दाखवणाऱ्या अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांचा आज (21 जून) वाढदिवस आहे.



‘सोनपरी’ बनून अवघ्या चिमुकल्यांचं विश्व व्यापून टाकलेल्या अभिनेत्री मृणाल कुलकर्णी या त्यांच्या अनेक भूमिकांमुळे प्रेक्षकांच्या कायम लक्षात राहिल्या.



मृणाल कुलकर्णी यांचा जन्म 21 जून 1971 रोजी पुण्यात झाला.



मालिकांव्यतिरिक्त मृणाल अनेक बॉलिवूड आणि मराठी चित्रपटांमध्येही झळकल्या आहेत.



मृणाल कुलकर्णी यांनी वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी ‘स्वामी’ या मराठी मालिकेतून पदार्पण केले.



या मालिकेत तिने पेशवे माधोराव यांच्या पत्नी रमाबाई पेशव्यांची भूमिका साकारली होती.



लहानपणापासून अभिनय करत असूनही, मृणाल यांना अभिनयात फारसा रस नव्हता. सुरुवातीला त्यांना त्यांचे शिक्षण पूर्ण करायचे होते. त्यावर लक्ष केंद्रित करायचे होते.



दरम्यान, त्यांना सतत अभिनयाच्या ऑफर्स येत होत्या. त्यानंतर 1994मध्ये मृणाल यांनी अभिनय क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पहिले नाही.



मृणाल यांनी मित्र रुचिर कुलकर्णी यांच्यासोबतच लग्नगाठ बांधी होती. या जोडीला एक मुलगा आहे. त्यांचा मुलगा विराजस कुलकर्णी हा देखील एक प्रसिद्ध अभिनेता आहे.



मृणाल कुलकर्णी या सध्या दिग्पाल लांजेकर यांच्या ‘शिवराज अष्टक’ चित्रपट सीरीजमध्ये ‘जिजाऊं’ची भूमिका साकारत आहेत.



Thanks for Reading. UP NEXT

मौनी रॉयच्या दिलकश अदा!

View next story