मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही लवकरच एका मल्याळम चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. मलईकोट्टई वलीबन या मल्याळम चित्रपटात सोनालीनं काम केलं आहे. मलईकोट्टई वलीबन या चित्रपटात सोनालीसोबतच प्रसिद्ध अभिनेते मोहनलाल हे देखील प्रमुख भूमिका साकारणार आहेत. मलईकोट्टई वलीबन या चित्रपटाचं शूटिंग पूर्ण झालेलं आहे. सोनालीनं मलईकोट्टई वलीबन या चित्रपटाच्या टीमसोबतचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. सोनालीनं या फोटोला कॅप्शन दिलं, 'जानेवारी ते जून - हा अविश्वसनीय प्रवास संपत आहे' सोनालीच्या या मल्याळम चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. सोनाली ही नटरंग, मितवा, पांडू, धुराळा, तमाळा, पोस्टर गर्ल यांसारख्या हिट चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस आली. सोनालीचा चाहता वर्ग मोठा आहे. सोनालीच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.