मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही सोशल मीडियावर तिच्या वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर करत असते. नुकतेच सोनालीनं तिच्या मराठमोळ्या लूकमधील फोटो शेअर केले आहेत. जांभळ्या रंगाची पैठणी, नथ आणि चंद्रकोर अशा लूकमध्ये सोनाली दिसत आहे. सोनालीच्या या लूकला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे. फोटोमधील सोनालीच्या स्माईलनं अनेकांचे लक्ष वेधले. सोनालीनं नटरंग चित्रपटातील अप्सरा आली या लावणीनं प्रेक्षकांची विशेष पसंती मिळवली. सोनालीनं मराठी चित्रपटांबरोबरच बॉलिवूडमध्ये देखील काम केलं आहे. 'सांगा मी कशी दिसते ..?' असं कॅप्शन सोनालीनं या फोटोला दिलं आहे. पांडू, मितवा, झिम्मा या चित्रपटातील सोनालीच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. अभिनयासोबतच सोनाली तिच्या नृत्यशैलीनं देखील प्रेक्षकांची मनं जिंकते.