अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि अभिनेत्री कियारा अडवाणी हे बॉलिवूडमधील सर्वात चर्चेत असलेल्या जोडप्यांपैकी एक आहेत.

दोघेही एकमेकांबद्दल कधीही उघडपणे बोलले नाहीत.

अनेकदा दोघेही डेटिंग आणि अफेअरसारखे प्रश्न टाळताना दिसले.

सध्या सिद्धार्थ आणि कियाराच्या लग्नाच्या बातम्या चर्चेत आहेत.

सिद्धार्थ मल्होत्राने नुकताच कियारा अडवाणीबद्दल एक मनोरंजक खुलासा केलाय.

एका मुलाखतीदरम्यान सिद्धार्थने सांगितले की कियारा अडवाणीचा नंबर त्याच्या फोनमध्ये स्पीड डायलवर आहे.

कियाराच्या फोनमध्ये देखील सिद्धार्थचा नंबर स्पीड डायलवर आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, दोघेही फेब्रुवारीमध्ये लग्नबंधनात अडकणार आहेत.

डेस्टिनेशन वेडिंगसाठी दोघांनी राजस्थानच्या थार वाळवंटात वालुकामय किनाऱ्यावर बनवलेला सूर्यगड पॅलेस निवडला आहे.

4 आणि 5 फेब्रुवारीला स्टार कपलचे प्री-वेडिंग फंक्शन्स होईल आणि 6 फेब्रुवारी रोजी दोघे विवाह बंधनात अशी माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.