ज्योतिषशास्त्रानुसार, शनिदेव 5 जूनपासून कुंभ राशीत वक्री होणार आहेत.
त्याचा प्रभाव सर्व राशींवर दिसून येणार आहे.
सोमवारी, 30 मे रोजी ज्येष्ठ मासातील कृष्ण पक्षातील अमावास्येला शनि जयंती आहे, या दिवशी काही विशेष उपाय करणे फायद्याचे ठरेल
5 जूनपासून कुंभ राशीतील शनीची वक्री जवळपास सर्व राशींवर परिणाम करेल. पण काही राशींवर त्याचा विशेष प्रभाव पडेल.
मीन राशीला साडेसाती सुरू होईल. तर कुंभ राशीच्या दुसऱ्या चरणात साडेसाती राहील.
साडेसातीचा शेवटचा टप्पा मकर राशीपासून सुरू होईल. तर कर्क आणि वृश्चिक राशीत ढैय्याची सुरुवात होईल
शनीदेवाला निळा आणि काळा रंग खूप प्रिय आहे. त्यामुळे या दिवशी शनिदेवाच्या मंदिरात जाऊन निळ्या रंगाची फुले अर्पण करा.
शनि जयंतीच्या दिवशी शनिदेवाच्या मूर्तीसमोर बसून किंवा शनिदेवाच्या मंदिरात जाऊन शनि मंत्राचा 108 वेळा जप करा. ज्यामुळे शनीची साडेसाती आणि ढैय्याचा प्रभाव कमी होऊ शकतो.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा)