शनीची साडेसाती आणि ढैय्या शुभ मानल्या जात नाहीत. असे मानले जाते की, जर साडेसाती आणि ढैय्या चालू असतील तर शनिदेव आपल्या जीवनात अशांतता निर्माण करतात.



पण जर तुम्ही कुणाला आधार दिलात, कुणाला मदत केली तर शनिदेव सुद्धा खूप शुभ फळ देतात.



अशा लोकांना शनिदेव देखील जीवनात अपार यश प्रदान करतात.



शनी देवाला कर्माचा दाता आणि न्याय देवता असेही म्हटले जाते. शनीला कलियुगातील दंडाधिकारी देखील मानले जाते.



शनि व्यक्तीच्या चांगल्या आणि वाईट कर्मांची गणना करतात. त्यामुळे शनिदेवाचा प्रकोप टाळण्यासाठी वाईट कृत्ये करणे टाळावे.



यासोबतच नियम आणि शिस्त पाळली पाहिजे. शनि ही श्रमाचीही देवता आहे. जे कठोर परिश्रम करतात त्यांचा आदर आणि संरक्षण करतात, त्यांना शनिदेव त्रास देत नाही.



याउलट जे लोक निराधारांचा आधार बनतात, त्यांना शनि जीवनात खूप शुभ फळ देतो.



शनिदेव 5 राशींवर विशेष लक्ष ठेवून आहे. सध्या शनि मकर राशीतून (शनि वक्री 2022) वक्री होत आहे. शनी या राशीचा स्वामी असून या राशीत साडेसाती आहे.



त्याचबरोबर धनु आणि कुंभ राशीत साडेसाती चालू आहे. यासोबतच मिथुन आणि तूळ या दोन राशींमध्ये शनी ढैय्या सुरू आहेत.