हिंदू धर्मात शनिदोष दूर करण्यासाठी आणि त्यांना प्रसन्न करण्यासाठी शनिवार हा सर्वोत्तम दिवस आहे



शनिवारी शनिदेवाची आराधना केल्याने शनिदोषापासून मुक्ती तर मिळते



ज्या लोकांवर शनीची कृपा आहे. त्यांना आयुष्यात कधीच अडचणी येत नाहीत.



ज्योतिषशास्त्रामध्ये शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी आणि त्यांचा आशीर्वाद मिळविण्याचे अनेक मार्ग सांगण्यात आले आहेत.



शनिदेवाच्या आठ पत्नींच्या नावाचा जप केल्यानेही शनिदेवाचे दोष दूर होतात, असे धार्मिक ग्रंथात लिहलंय.



शनीच्या एकूण 8 पत्नींची नावे शास्त्रात आढळतात.



ज्योतिषशास्त्रीय ग्रंथानुसार शनिदेवाच्या 8 पत्नी पुढीलप्रमाणे आहेत, ध्वजिनी, धामिनी, कंकाली, कलहप्रिया, कंटकी, तुरंगी



महिषी आणि अजा. शनिदेवांच्या 8 पत्नींच्या नावाचा किंवा मंत्रांचा जप केल्याने सर्व प्रकारचे अडथळे दूर होतात



शनिदेवाच्या पत्नींचा मंत्र - ध्वजिनी धामिनी चैव कंकाली। कंटकी कलही चाथ तुरंगी महिषी अजा।।
शनेर्नामानि पत्नीनामेतानि संजपन पुमान्। दुःखानि नाशयेन्नित्यं सौभाग्यमेधते सुखम।।



शनिदेवाच्या 8 पत्नींसह त्यांच्या नावाचा जप केल्यास जीवनातील मोठे संकट टळू शकते, अशी धार्मिक मान्यता आहे.