जवान या चित्रपटामधील 'जिंदा बंदा' हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीस आलं आहे. 'जिंदा बंदा' या गाण्यामध्ये शाहरुख हा अनेक डान्सर्ससोबत डान्स करताना दिसत आहे. 'जिंदा बंदा' या गाण्यात शाहरुखसोबतच सान्या मल्होत्रा, प्रियामणी, गिरिजा ओक, संजीता भट्टाचार्य या अभिनेत्री देखील थिरकताना दिसत आहेत. जिंदा बंदा गाण्यातील शाहरुखच्या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. 'जिंदा बंदा' या गाण्यामध्ये शाहरुख हा रेड शर्ट ब्लॅक पँट आणि गॉगल अशा डॅशिंग लूकमध्ये दिसत आहे. गाण्याच्या शेवटच्या भागात शाहरुख हा व्हाईट शर्ट आणि ब्लॅक पँट अशा लूकमध्ये दिसतो. 'जिंदा बंदा' या गाण्याची कोरिओग्राफी प्रसिद्ध कोरिओग्राफर शोबीनं केली आहे. जिंदा बंदा हे गाणं हिंदी भाषेबरोबरच तमिळ आणि तेलुगू या भाषेमध्ये देखील रिलीज झालं आहे. जिंदा बंदा गाण्यातील शाहरुखच्या जबरदस्त डान्सनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. शाहरुखचा जवान हा चित्रपट 7 सप्टेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.