शाहरुख खानची मुलगी सुहाना खान अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा याला डेट करत आहे.
बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये स्टार्सच्या रिलेशनशिपच्या बातम्या येतच असतात.
आता चर्चा आहे की, शाहरुख खानची मुलगी सुहाना खान अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा याला डेट करत आहे
खरंतर, या चर्चेची सुरुवात ही गेल्या वर्षी झोया अख्तरच्या ‘द आर्चीज’ या चित्रपटापासून सुरू झाली.
असेही सांगितले जाते की, अगस्त्यने आधीच त्याच्या कुटुंबियांशी सुहानाची ओळख जोडीदार म्हणून केली आहे.
'द आर्चीज' चित्रपटाशी संबंधित एका सूत्राने सांगितले की, सुहाना खान आणि अगस्त्य नंदा रिलेशनशिपमध्ये आहेत.
अगस्त्यने सुहानाची त्याच्या कुटुंबाशीही ओळख करून दिली आहे.
सूत्रानुसार, गेल्या वर्षी ख्रिसमसच्या निमित्ताने कपूर कुटुंबाने एका पार्टीचे आयोजन केले होते,
ज्यामध्ये अगस्त्य नंदाने सुहाना खानची त्यांच्या कुटुंबातील सदस्यांशी ओळख करून दिली होती.
त्यांनी कधीही कोणापासून आपले बॉन्डिंग लपवले नाही.