संगीत क्षेत्रामधील प्रसिद्ध संगीतकार ए.आर.रहमानचा आज 56 वा वाढदिवस आहे.

ए.आर.रहमान यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळते.

ए.आर. रहमान यांना त्यांच्या संगीत क्षेत्रातील कामासाठी अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलं.

ए.आर रहमान यांचा जन्म 6 जानेवारी 1967 रोजी चेन्नई, तामिळनाडू येथे झाला.

ए.आर रहमान यांचे खरे नाव ए.एस दिलीप कुमार आहे.

हे नाव त्यांनी नंतर बदलले. एआर रहमान यांनी वयाच्या 11व्या वर्षापासून काम करायला सुरुवात केली होती.

ए आर रहमान यांना संगीताचा वारसा मिळाला आहे.

त्यांचे वडील आरके शेखर हे मल्याळम चित्रपटांमधील गाण्यांना संगीत द्यायचे.

ए आर रहमान हे मास्टर धनराज यांच्याकडून संगीतातील बारकावे शिकले.

लंडनच्या ट्रिनिटी कॉलेज ऑफ म्युझिकमधून शिष्यवृत्तीही मिळाली.