पुन्हा एकदा उर्फी जावेदने कॅमेऱ्यांसमोर येऊन लोकांना आश्चर्यचकित केले आहे.



उर्फी नेहमीच काहीतरी वेगळं करण्याच्या शर्यतीत असते, पण यावेळी या सौंदर्याने फॅशनच्या मर्यादा ओलांडल्या आहेत.



या ड्रेसला काय नाव द्यायचं हे आपल्या समजण्यापलीकडचं आहे, पण ओव्हरसाईज सूट घालून बाहेर पडलेल्या उर्फीची स्टाइल सगळ्यांच्या कल्पनेपलीकडची होती.



कोटातून मुंडी काढून उर्फी रस्त्यावर आली तेव्हा तिला पाहण्यासाठी लोकांची गर्दी झाली आणि सोशल मीडियावरही प्रतिक्रियांचा पूर आला.



आपल्या हटके फॅशन स्टाईलमुळे उर्फी जावेद नेहमीच चर्चेत असते.



उर्फी जावेद लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.



उर्फी जावेदने छोट्या पडद्यावरील अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये काम केलं आहे.



'बिग बॉस ओटीटी'च्या (Bigg Boss OTT) माध्यमातून उर्फीला चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे.



बडे भैया की दुल्हनिया, चंद्र नंदिनी, मेरी दुर्गा, सात फेरो की हेरा फेरी, बेपनाह, डायन, ये रिश्ता क्या कहलाता है अशा अनेक मालिकांमध्ये उर्फीने काम केलं आहे.



आता उर्फी लवकरच रुपेरी पडद्यावर पदार्पण करणार असल्याची चर्चा आहे.