प्रेमाचं प्रतिक असणाऱ्या गुलाबाचा वापर विविध फेसपॅक तयार करण्यासाठी देखील केला जाऊ शकतो.
गुलाबाचा वापर करुन फेसपॅक (Beauty Tips) कसा तयार करायचा? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल.
गुलाबाचे विविध प्रकारचे फेसपॅक तयार करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम गुलाबाची पेस्ट तयार करावी लागेल.
गुलाबाच्या काही पाकळ्या घ्या आणि त्या पाण्यानं स्वच्छ करा. या पाकळ्या मिक्समध्ये टाकून त्याची पेस्ट तयार करुन घ्यावी. या पेस्टचा वापर तुम्ही विविध फेसपॅक तयार करण्यासाठी करु शकता.
गुलाबाच्या पेस्टचा वापर करुन तुम्ही गुलाब हनी फेस पॅक तयार करु शकता. यासाठी गुलाबपेस्टमध्ये गुलाब पाणी आणि मध मिक्स करा. हा पॅक चेहऱ्याला 20 मिनिटे लावा. त्यानंतर थंड पाण्यानं चेहरा धुवा.
गुलाब चंदन फेसपॅक तयार करण्यासाठी गुलाबा पेस्टमध्ये चंदन पावडर मिक्स करा. त्यानंतर या मिश्रणात थोडे एक किंवा दोन चमचे दूध टाका.
गुलाब चंदन फेसपॅक या फेसपॅकमुळे चेहऱ्याचे स्क्रबिंग होते. त्यामुळे चेहऱ्यावरील डेड स्किन निघून जाते.
गुलाबाच्या पेस्टमध्ये कोरफड जेल मिक्स करून चेहऱ्याला लावा. वीस मिनिटांनी चेहरा धुवा.
कोरफड जेल आणि गुलाबाच्या पॅकमुळे स्किन टायनिंग होते. तसेच चेहऱ्यावरील डाग देखील जातात.
गुलाबाच्या पेस्टमध्ये दही मिक्स करुन ते देखील तुम्ही चेहऱ्यावर लाऊ शकता.