अनेक जणांना कॉफी (Coffee) पिणं आवडतं. कॉफी न प्यायल्यास अनेकांच्या दिवसाची सुरुवातही होत नाही.
योग्य प्रमाणात कॉफीचं सेवन शरीरासाठी चांगलं आहे. पण कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईट ठरतो. कॉफीचं जास्त प्रमाणात सेवन केल्यास तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो.
जास्त प्रमाणात कॉफीचं सेवन केल्यामुळे शरीरात कोलेस्ट्रॉल वाढून अनेक गंभीर आजारांना आमंत्रण मिळेल. त्यामुळे यावर वेळीच उपाय करणं गरजेचं आहे.
जास्त प्रमाणात कॉफी प्यायल्यास त्यामुळे आरोग्या संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात.
कॉफीमध्ये जास्त प्रमाणात कॅफीन असते. याचं अधिक सेवन केल्यात शरीरात कोलेस्टेरॉल वाढतं आणि हे अनेक गंभीर आजारांसाठी कारणीभूत ठरतं.
कॉफीमुळे शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉलची पातळी वाढते हे अनेक संशोधनांमध्ये सिद्ध झालं आहे. मात्र, तुम्ही किती कॉफी पितात यावर ते अवलंबून असतो.
विशेष म्हणजे कॉफीचा महिला आणि पुरुषांच्या कोलेस्टेरॉलच्या पातळीवर वेगवेगळ्या प्रकारे परिणाम होतो.
एका संशोधनानुसार, कॉफीचं जास्त सेवन केल्यानं शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉलची पातळी वाढते. त्यामुळे कॉफीचं सेवन कमी प्रमाणात करावं.
ब्लॅक कॉफी ह्रदयासाठी लाभदायक असल्याचं अभ्यासातून समोर आले आहे. पण यासाठी कॉफीचे सेवन योग्य प्रमाणात करणं गरजेचं आहे.
दररोज एक किंवा दोन कप ब्लॅक कॉफी प्यायल्यास हृदयविकाराचा धोका कमी होतो.
कॉफीमध्ये अँटीऑक्सिडंट्सही असतात, हे आरोग्यासाठी फायदेशीर असतात. पण कॉफीचा अतिरेक आरोग्यासाठी हानिकारक आहे.