अभिनेता रणवीर सिंह आणि अभिनेत्री आलिया भट्ट यांच्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.
फिल्ममेकर करण जोहरच्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटाची रिलीज डेट आज जाहीर करण्यात आली आहे.
करण जोहर, आलिया भट्ट आणि रणबीर सिंह यांनी सोशल मीडियावर 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटाचं पोस्टर शेअर करुन या चित्रपटाची रिलीज डेट जाहीर केली आहे.
'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटात राणी ही भूमिका अभिनेत्री आलिया भट्टनं साकारली आहे.
'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटातील रॉकीच्या म्हणजेच रणवीरच्या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटाच्या पोस्टरमधील रणवीर हा फंकी लूकमध्ये दिसत आहे.
'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये चॅटर्जी कुटुंबात आलिया आणि शबाना आझमी यांच्यासोबत इतर काही सदस्य दिसत आहेत.
'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटातील रंधवा या कुटुंबात रणवीरसोबतच जया बच्चन, धर्मेंद्र, क्षिती जोग हे दिसत आहेत.
'रॉकी और रानी की प्रेम कहानी' हा चित्रपट 28 जुलै 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.