आर माधवन, नंबी नारायणन आणि रॉकेट्रीची टीम चा अनोखा उपक्रम

रॉकेट्री या चित्रपटाला भारतीय जेष्ठ वैज्ञानिक नंबी नारायणन यांच्या जीवनावर आधारित माहितीपट म्हणता येईल.

रॉकेट्री हा चित्रपट ISRO च्या संघर्षकथेबद्दलही बोलून जातो.

मूलन फाउंडेशनच्या धर्मादाय कार्यक्रमात ६० मुलांसाठी हृदय शस्त्रक्रिया करण्यासाठी रॉकेट्री टीम ची अनोखी मोहीम

जन्मजात हृदयविकाराच्या समस्या असलेल्या 60 मुलांचे जीवन बदलून टाकण्यासाठी हृदय शस्त्रक्रियेची सोय रॉकेट्री टीमकडून करण्यात आली आहे.

ही ६० केरळमधील वंचित मुल आहेत.

हा उदात्त उपक्रम रॉकेट्री: द नंबी इफेक्ट या चित्रपटाच्या टीम ने केला आहे.

'रॉकेट्री: द नंबी इफेक्ट' या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे.

चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार साजरा करण्यासाठी रॉकेट्री निर्माते वर्गीस मूलन आणि विजय मूलन यांनी एक उदात्त प्रयत्न सुरू केला.

एखाद्या कलाकृतीला जसा हळूहळू आकार दिला जातो, तसा हा चित्रपट हळूहळू पुढे सरकत जातो आणि आपल्या उद्दिष्टापर्यंत पोचतो.