मुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजची वार्षिक सर्वसाधारण सभा आज. आजच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मुकेश अंबानी काय घोषणा करणार? याकडे लक्ष लागलं आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज भारतीय बाजारपेठेतील सर्वात मोठी कंपनी असल्यानं तिच्या सर्वसाधारण बैठकीची अनेकांना प्रतिक्षा असते. मात्र, गेल्या काही वर्षांत या सर्वात मोठ्या कॉर्पोरेट कार्यक्रमाचं महत्त्व अधिकच वाढलं आहे. प्रत्येक वेळी वार्षिक सर्वसाधारण बैठकीत मुकेश अंबानींकडून गुंतवणूक दारांसाठी अनेक मोठ्या घोषणा केल्या जातात. रिलायन्सच्या AGM मध्ये वर्षभरातील व्यवसाय, उद्योग धोरणाची माहिती दिली जाते. आजच्या AGM मधूनही अनेक मोठ्या घोषणा होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. IPO, Jio फायनान्शियल सर्व्हिसेज, 5जी, जियो एयरफायबर यांसंदर्भात आजच्या AGM मध्ये घोषणा होण्याची शक्यता आहे. न्यू एनर्जी आणि रिलायन्स रिटेलचा विस्तार यासंदर्भातही आजच्या AGM मध्ये घोणषा होण्याची शक्यता