बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता रणवीर सिंह चित्रपटांमधील अभिनयाबरोबरच त्याच्या वेगवेगळ्या अतरंगी लूकमुळे देखील चर्चेत असतो. रणवीरच्या अतरंगी लूकला त्याच्या चाहत्यांची पसंती मिळते तर काही नेटकरी त्याला ट्रोल देखील करतात. रणवीरचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या व्हिडीओमधील त्याच्या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले. रणवीरच्या या आऊटफिटची किंमत ऐकून तुम्ही देखील थक्क व्हाल. रणवीरच्या व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये तो Gucci या ब्रँडनं डिझाइन केलेल्या आऊट-फिटमध्ये दिसत आहे. व्हिडीओमध्ये रणवीर पिंक कलरचे प्रिंटेड आऊट- फिट आणि पायात रंगीत शूज अशा लूकमध्ये दिसत आहे. रिपोर्टनुसार, रणवीरनं घातलेल्या या प्रिंटेड आऊट फिटची किंमत जवळपास एक लाख रूपये आहे.