भारत आणि श्रीलंका (IND Vs SL) यांच्यात 12 मार्चपासून दुसरा कसोटी सामना खेळला जाणार आहे. हा सामना बंगळुरूच्या (Bengaluru) एम. चिन्नास्वामी स्डेडिअमवर (M Chinnaswamy Stadium) खेळला जाणार आहे. या सामन्यात भारताचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) खास विक्रमाला गवसणी घालू शकतो. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत तो ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज खेळाडू मार्क वॉला (Mark Waugh) मागे टाकू शकतो. मार्क वॉनं कसोटी क्रिकेटच्या 128 सामन्यात 8 हजार 39 धावा केल्या आहेत. विराट कोहलीनं 100 कसोटी सामन्यात 8007 धावांचा टप्पा गाठलाय. ज्यात ज्यात 27 शतक आणि 28 अर्धशतकांचा समावेश आहे. विराट कोहलीने बंगळुरू कसोटीत शतक झळकावलं तर कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत तो अनेक खेळाडूंना मागे टाकू शकतो. 2019 मध्ये बांग्लादेशविरुद्ध खेळण्यात आलेल्या कसोटी सामन्यात अखरेचं कसोटी शतक झळकावलं होतं. श्रीलंकाविरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यात विराट कोहली शतकांचा दुष्काळ संपवेल, अशी अपेक्षा केली जात आहे.