रकुल प्रीत स्टायलिश डिझायनर मल्टी-कलर ओव्हरसाईज ब्लेझर आणि ब्लू बूटकट पॅंटमध्ये तिचा आगामी चित्रपट ‘रनवे 34’चे प्रमोशन करताना दिसली. यादरम्यान तिच्या स्टाईलवर साऱ्यांच्याच नजर खिळल्या होत्या.
रकुल प्रीत तिच्या आगामी थ्रिलर चित्रपट ‘रनवे 34’च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. ज्यात ती अजय देवगण आणि अमिताभ बच्चन यांच्यासोबत झळकणार आहे. 21 मार्च रोजी या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला.
या प्रमोशनवेळी रकुल प्रीतने बूटकट ब्लू पँट आणि मल्टीकलर ब्लेझर घातला होता, जो तिच्यावर चांगला दिसत होता.
रकुल प्रीतने ओव्हरसाईज ब्लेझर घालून आणि स्लीव्हज वर करून तिचा लूक थोडासा कॅज्युअल ठेवला होता.
सोशल मीडियावर फोटो शेअर करताना रकुल प्रीतने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘हा रंगतदार दिवस आहे #runway34 ट्रेलर आऊट.’
अभिनेत्री रकुल प्रीत सिंहचा हा पोशाख फॅशन डिझायनर तानाज फातिमा एम. चर्नीच्या कलेक्शनमधला आहे.