रजनीकांत बस नाम ही काफी है...

दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांतची क्रेझ चाहत्यांमध्ये कायम आहे.

अभिनेत्याचा 'जेलर' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर दणदणीत कमाई करत आहे.

10 ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या या सिनेमाने जगभरात 600 कोटींची कमाई केली आहे.

या सिनेमासाठी अभिनेत्याने चांगलच मानधन घेतलं आहे.

रजनीकांतच्या 'जेलर'ने जगभरात रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे.

'जेलर' या सिनेमासाठी अभिनेत्याला 110 कोटी रुपये आधीच दिले होते.

पण आता सिनेमाच्या यशानंतर अभिनेत्याच्या मानधनात आणखी वाढ झाली आहे.

रजनीकांतला 'जेलर' या सिनेमासाठी एकूण 210 कोटी रुपये मानधन मिळालं आहे.

त्यामुळे रजनीकांत हा देशातील सर्वात महागडा अभिनेता झाला आहे.