पालघर जिल्ह्यात मुसळधार पाऊस

गेल्या सहा दिवसापासून पालघर जिल्ह्यात पावसाची जोरदार हजेरी

शेतात पाणी साचल्यामुळं शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या

पालघर जिल्ह्यात आज पहाटेपासून मुसळधार पावसानं हजेरी लावली.

जिल्ह्यातील नदीनाले भरून वाहायला सुरुवात झाली आहे.

मुसळधार पावसामुळं पालघर जिल्ह्यातल्या धरणांच्या पाणी पातळीतही कमालीची वाढ झाली आहे.

जिल्ह्यातील सूर्या, वैतरणा आणि पिंजाळ या प्रमुख नद्यांना पूर आला आहे

पालघर जिल्ह्यात काही ठिकाणी वाहतुकीवरही परिणाम झाला आहे

सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळं आणि शेतात पाणी साचल्यामुळं त्या पेरण्याही आता खोळंबल्या आहेत.