मागील 48 तासांत तळकोकणात आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक भागांत चांगला पाऊस झाला आहे.



येत्या 48 तांसात महाराष्ट्रात काही भागात मान्सूनसाठी अनुकूल वातावरण असल्याने तो पुढे सरकण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.



मागील 48 तासांत रत्नागिरी, सिंधदुर्ग, कोल्हापूर परिसरात चांगला पाऊस झाल्याने आम्ही मान्सूनची घोषणा केली आहे.



पुढील 48 तासांत कोकण आणि मध्य महाराष्ट्र पाऊस अपेक्षित आहे. त्यामुळे मान्सूनसाठी अनुकूल वातावरण आहे, अशी माहिती मुंबई प्रादेशिक हवामान विभाग प्रमुख सुनिल कांबळे यांनी दिली आहे.



जोपर्यंत 50 ते 60 मिमी म्हणजेच पेरणीलायक पाऊस होत नाही तोपर्यंत पेरणीचा शेतकऱ्यांनी विचार करु नये, असंही त्यांनी सांगितलं आहे.



कोकणासह मध्य महाराष्ट्रात पावसानं हजेरी लावली असली तरी, विदर्भासह मराठवाड्यातील शेतकऱ्यांची प्रतीक्षा कायम आहे.



विदर्भासह मराठवाड्यात पुढील 7 ते 8 दिवस पावसासाठी अनुकूल वातावरण नसल्याचं तज्ज्ञांचं मत आहे.



त्यामुळे विदर्भासह मराठवाड्यातील शेतकऱ्यांना अजून पावसाची वाट पाहावी लागणार आहे.



बिपरजॉय चक्रीवादळ मुंबईपासून 500 ते 600 किलोमीटर अंतरावरून पुढे जात आहे.



या चक्रीवादळाने तीव्र चक्रीवादळाच्या श्रेणीत प्रवेश केला असून हे गुजरातच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.