अंबानींची होणारी सून राधिका मर्चंटही (Radhika Merchant) कोट्यवधींची मालकीन आहे.
राधिका मर्चंट ही उद्योगपती वीरेन मर्चेंट (Viren Merchant) यांची एकुलती एक मुलगी आहे.
राधिका लहानपणापासूनच आलिशान आयुष्य जगत आली आहे.
राधिका स्वत: 10 कोटी रुपये संपत्तीची मालकीन आहे.
राधिकाचे वडील वीरेन मर्चेंट हे देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपतींपैकी एक असून 755 कोटी रुपयांच्या संपत्तीचे ते मालक आहेत.
राधिका एक उत्कृष्ट नृत्यांगना आहे. तिने शास्त्रीय नृत्याचं प्रशिक्षण घेतलं आहे.
मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि नीता अंबानी (Nita Ambani) यांनी 2022 मध्ये राधिकाच्या अरंगेत्रम समारंभाचं आयोजन केलं होतं.
राधिकाने न्यूयॉर्क विद्यापीठातून राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र विषयात पदवी मिळवली आहे.
राधिका आता 28 वर्षांची असून निभा आर्ट्सच्या गुरू भावना ठाकर यांच्याकडून ती भरतनाट्यम शिकली आहे.
राधिका आणि अनंत अंबानीच्या लग्नाची चाहत्यांना आता उत्सुकता आहे.