अभिनेता अक्षय कुमारचा ओएमजी-2 हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटामधील लूकचा फोटो काही दिवसांपूर्वी अक्षयनं सोशल मीडियावर शेअर केला होता. ओएमजी-2 या चित्रपटामधील अक्षयच्या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले. आता या चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. ओएमजी-2 चित्रपटाच्या टीझरच्या सुरुवातीला कांती शरण मुद्गल हे दिसत आहे. टीझरमध्ये दिसते की कांती शरण मुद्गल हे भगवान शंकराचे भक्त आहेत. ते शंकराची पूजा करतात. कांती शरण मुद्गल ही भूमिका अभिनेते पंकज त्रिपाठी यांनी साकारली आहे. अक्षयनं ओएमजी-2 या चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर शेअर केला आहे. या टीझरला त्यानं कॅप्शन दिलं, 'रख विश्वास, 11 ऑगस्टला ओएमजी-2 थिएटरमध्ये रिलीज होत आहे.' ओएमजी-2 हा चित्रपट 11 ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.