भारतीय प्रजासत्ताकाच्या दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार,

यांनी पोलीस कवायत मैदान येथे झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रध्वज फडकावून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली.

अजित पवार यांच्या हस्ते एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत,

अंगणवाडी सेविकांना प्रातिनिधिक स्वरूपात स्मार्टफोनचे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमानंतर उपमुख्यमंत्री पवार यांनी उपस्थित स्वातंत्र्य सैनिक, माजी सैनिक, निमंत्रितांची भेट घेऊन प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.

कार्यक्रमाला महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी यांच्यासह स्वातंत्र्यसैनिक,

विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी-कर्मचारी, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, नागरिक उपस्थित होते.