अभिनेत्री प्राजक्ता माळी ही महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करते. नुकतच प्राजक्तानं महाराष्ट्राची हास्यजत्राच्या टीमसोबत लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं. प्राजक्तानं हे फोटो शेअर करुन त्याला कॅप्शन दिलं, 'आणि यावेळी राजाचं दर्शन हास्यजत्रेच्या कुटूंबाबरोबर झालं. ' प्राजक्तानं हे खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. प्राजक्ताच्या या पोस्टला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे. प्राजक्ता तिच्या मराठमोळ्या लूकमधील फोटो देखील सोशल मीडियावर शेअर करते . प्राजक्ताच्या फोटोवर नेटकरी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करतात. काही महिन्यांपूर्वी लकडाऊन हा प्राजक्ताचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. प्राजक्ताबरोबरच लकडाऊन या चित्रपटामध्ये अभिनेता अंकुश चौधरीनं देखील प्रमुख भूमिका साकारली होती. जुळून येती रेशिमगाठी या मालिकेमुळे प्राजक्ताला विशेष लोकप्रियता मिळाली.