छोट्या पडद्यावरील अभिनेत्री कनिका मान हिचा काही दिवसांपूर्वी वाढदिवस होता. तिने बर्थडे पार्टी आयोजित केली होती. अभिनेत्री कनिका मान 7 ऑक्टोबर रोजी 29 वर्षांची झाली. कनिका मानच्या बर्थडे पार्टीमध्ये अनेक कलाकारांनी हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं. पार्टीतील फोटोंमध्ये कनिका मान तिच्या गेस्टसोबत पोज देताना आणि त्यांच्यासोबत मजा करताना दिसत आहे. कनिका मान तिच्या बर्थडे पार्टीमध्ये ब्लॅक कलरच्या सॅटीन ड्रेसमध्ये फारच ग्लॅमरस दिसत होती. 'खतरों के खिलाडी 12' फेम कनिका मान खऱ्या आयुष्यात खूपच ग्लॅमरस आहे. कनिकाने तिच्या इन्स्टाग्रामवर वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे फोटो शेअर केले आहेत. राहुल वैद्यही कनिकाच्या बर्थडे पार्टीमध्ये सामील झाला होता. सिद्धार्थ निगमसह छोट्या पडद्यावरील अनेक स्टार्स या पार्टीत हजर होते. कनिका मानच्या बर्थडे पार्टीमध्ये रश्मी देसाई आणि सरगुन कौर लूथरा यांनीही हजेरी लावली.