मराठमोळी अभिनेत्री पूजा सावंतला मराठीतील उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून ओळखलं जातं पूजाने आपल्या अभिनयाच्या जोरावर आपलं एक खास स्थान निर्माण केला आहे पूजा नुकतंच 'दगडी चाळ 2' या चित्रपटात झळकली आहे. चित्रपटांमध्ये कारकीर्द सुरू करण्यापूर्वी, पूजाने 2008 मध्ये महाराष्ट्र टाइम्स श्रावण क्वीन ही सौंदर्य स्पर्धा जिंकली होती. तिने मराठी इंडस्ट्रीत तिच्या कारकिर्दीची सुरुवात मल्टीस्टारर 'क्षणभर विश्रांती'मधून केली. पूजाने सध्या एक नवं फोटोशूट सोशल मीडियाद्वारे शेअर केलं आहे. ज्यात तिने पिवळ्या रंगाचा लेहंगा परिधान केलेला दिसत आहे. या फोटोशूटसाठी तिने न्यूड मेकअप केला आहे आणि केस बांधले आहेत. नवरात्री निमित्त तिने आज हे पिवळ्या रंगातील फोटो शेअर केले आहेत. (फोटो सौजन्य :iampoojasawant/इंस्टाग्राम)