साऊथची ग्लॅमरस अभिनेत्री पूजा हेगडेचा जन्म 13 1990 रोजी मुंबईत झालाय.

पूजाने तिचं सुरूवातीचं शिक्षण मुंबईतील मानेकजी कपूर एज्युकेश ट्रस्टमधून पूर्ण केलं.

अभिनेत्री तमन्ना भाटिया ही शाळेत पूजा हेगडेची सीनिअर होती.

पूजाने एम. एम. के कॉलेजमधून एम ए कॉमर्सची पदवी घेतली.

पूजा कॉलेजला असल्यापासूनच डान्स आणि फॅशन शोमध्ये सहभाग घेत असे.

शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पूजाने मॉडेलिंग सुरू केले.

2009 मध्ये पूजाने मिस इंडिया सौदर्य स्पर्धेत भाग घेतला होता.

मिस इंडिया सौदर्य स्पर्धेच्या सुरूवातीलच पूजा त्यातून बाहेर झाली होती. तरी देखील तिने हार मानली नाही.

2010 मधील मिस यूनिवर्स इंडिया स्पर्धेत पूजा सेकंड रनर-अप राहिली.