रिचर्ड गिअरसोबत एका सार्वजनिक कार्यक्रमात केलेल्या 'किस'मुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या शिल्पा शेट्टीनं याप्रकरणातून आरोपातूनमुक्त करण्यासाठी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे.

शिल्पानं याबाबतील कनिष्ठ न्यायालयात दाखल केलेला अर्ज फेटाळून लावल्यानंतर शिल्पानं त्या निर्णयाला आता मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे.

न्यायमूर्ती आर. जी. अवचट यांच्यासमोर नुकतीच यावर सुनावणी झाली.

साल 2007 च्या घटनेचा तो व्हिडिओ पाहिल्यास शिल्पाचा कोणतंही अश्लिल कृत्य करण्याचा हेतू नव्हता.

साल 2007 मध्ये एड्स जनजागृतीसाठी राजस्थानमधील एका जाहीर कार्यक्रामात अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि हॉलीवूड अभिनेता रिचर्ड गिअर उपस्थित होते.

या कार्यक्रमा दरम्यान, गिअरनं अचानकपणे शिल्पाला जवळ ओढत सर्वांसमोर किस केलं होतं.

आपल्यासाठी हे सारं अनपेक्षित असल्याचं शिल्पानं जाहीर स्पष्टीकरण दिलं होतं.

त्यानंतर शिल्पा शेट्टीवर अश्लिलता आणि असभ्यता पसरविल्याचा आरोप करत जयपूर, अलवर आणि गाझियाबाद इथं स्वतंत्र फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले.

राजस्थान न्यायालयानं शिल्पा आणि गिअरविरोधात अटक वॉरंटही जारी केले होते.

त्यानंतर शिल्पाच्या विनंतीवरून हे प्रकरण राजस्थानमधील न्यायालयाकडून मुंबई दंडाधिकारी न्यायालयात वर्ग करण्यात आलं.