सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रेडी समुद्रकिनारी दुर्मिळ 'पफर फिश' (Puffer Fish) मृतावस्थेत आढळला.



हा मासा एक ते दीड फूट लांबीचा असून त्याच्या संपूर्ण शरीरावर तीक्ष्ण काटे आहेत.



समुद्रामध्ये हा मासा झुंडीने राहतो. हा मासा मच्छीमारांच्या जाळ्यात अडकला तर जाळी फाडून टाकतो.



या माशाचे शरीर सुरुवातीला लहान असते. मात्र कुणाचा स्पर्श झाला किंवा संकटाची चाहूल लागली तर तो शरीर फुगवून मोठे करतो.



हा मासा खोल समुद्रात राहतो आणि लहान माशांना खाऊन जगतो. मासे खाण्यासाठी तो समुद्र किनाऱ्यालगतही येतो.



समुद्रात होणाऱ्या बदलाचा फटका या माशाला बसला असावा असा अंदाज आहे.



रेडी समुद्रकिनारी हा मासा अक्षय मेस्त्री या पर्यटकाला मृतावस्थेत दिसला.



या माशाला 'केंड मासा' असेही म्हणतात.



मासा विषारी आहे. त्यामुळे समुद्रकिनारी खड्डा खोदून त्याची विलेवाट लावण्यात आली.