चांदीचे दान - पितृ पक्षात पितरांच्या नावाने दान केल्यास पितर प्रसन्न होतात आणि आशीर्वाद देतात,



या काळात एखाद्या व्यक्तीने चांदीचे दान केल्यास कुटुंबातील सर्व रोग दूर होतात.



ज्योतिष शास्त्रामध्ये चांदीला चंद्राचा कारक मानले जाते, त्यामुळे पितृ पक्षात चांदीचे दान केल्याने सर्व रोगांपासून मुक्ती मिळते.



यामुळे कुटुंबात सुख, शांती आणि एकता कायम राहते.



दुसरीकडे, सोने दान करणे म्हणजे त्याच्या गुरूशी संबंधित सर्व अडथळे दूर होतात.



पितृ पक्षात सर्वपित्री अमावस्येला पितरांना खीर अर्पण करण्याचा नियम आहे.



दूध आणि तांदळाची खीर आणि पुरी पितरांना अर्पण करावी. यामुळे पित्र खूश होतात.



असे मानले जाते की, असे केल्याने सुख-समृद्धी वाढते आणि घरातील आर्थिक समस्या दूर होतात.



टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे.



यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.