शारदीय नवरात्रीला दुर्गा मातेचा आशीर्वाद घेण्यासाठी घटस्थापनेचा शुभ मुहूर्त 26 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 06:28 ते 08:01 पर्यंत असा असेल.



नवरात्रीत देवी भक्तांच्या घरी येते, शारदीय नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घराच्या मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूला स्वस्तिक बनवावे



दारावर आंब्याचे तोरण आणि अशोकाच्या पानांचा तोरण लावावे. 



नवरात्रात मातेची मूर्ती लाकडी चौकटीवर किंवा आसनावर बसवावी. जिथे मूर्ती किंवा चित्र स्थापित केले असेल तिथे प्रथम स्वस्तिक चिन्ह बनवावे.



त्यानंतर रांगोळी व अक्षता यांचे मिश्रण करून तेथे मातेच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करावी. त्यानंतर विधिपूर्वक मातेची पूजा करावी.



तुम्हीही दरवर्षी कलशाची स्थापना करत असाल तर कलश ईशान्य दिशेला ठेवून आईच्या घटस्थापनेची सजावट करावी.



कलशावर नारळ ठेवताना नारळाचे मुख खालच्या दिशेला असता कामा नये हे ध्यानात ठेवावे.



पितृपक्ष संपताच शारदीय नवरात्रीला सुरुवात होईल. हिंदू धर्मात नवरात्रोत्सवाला विशेष महत्त्व आहे.



यावेळी नवरात्री 26 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर 2022 या कालावधीत होणार आहे.