पितृपक्षाचा महिना सुरू झाला आहे. हिंदू धर्मात (Hindu Religion) पितृ पक्षाला खूप महत्त्व आहे.



अशी मान्यता आहे की, या दिवसांत आपल्या प्रियजनांना भेटण्यासाठी पूर्वज यमलोकातून पृथ्वीवरील येतात



पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी पितृपक्षात तर्पण आणि श्राद्ध केले जाते.



हिंदू धर्मानुसार असे मानले जाते की, जर पितरांसाठी श्राद्ध केले तर पितर आपल्या वंशजांना आशीर्वाद देतात, ज्यामुळे घरात सुख-समृद्धी येते.



यंदा पितृपक्ष 10 सप्टेंबरपासून सुरू होत आहे. तर, रविवारी, 25 सप्टेंबरला पितृपक्षाची समाप्ती होईल



पितृपक्ष हा 15 दिवसांचा कालावधी आहे, जो हिंदू कॅलेंडरनुसार भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेच्या दिवशी सुरू होतो.



शास्त्रानुसार पितृपक्षात श्राद्धासाठी तयार करण्यात आलेल्या पाच विशेष प्रकारच्या जीवांना भोजन देण्याचा नियम आहे



यासाठी सर्व प्रथम ब्राह्मणांसाठी शिजवलेले अन्न पाच भागांमध्ये काढून सर्वांचे वेगवेगळे मंत्र जपत, प्रत्येक भागावर अखंड ठेवून पंचबली अर्पण केली जाते.



पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी या दिवसांत श्राद्ध आणि तर्पण केले जाते.



असे मानले जाते की, पितृपक्षातील श्राद्ध विधीने पितरांना मोक्ष मिळतो.