ज्योतिष शास्त्रात (Jyotish Shashtra) असे म्हटले आहे की शनिदेव लोकांना त्यांच्या कर्मानुसार फळ देतात
या दिवशी शनिदेवाची पूजा विधीपूर्वक केली जाते. यामुळे शनिदेव खूप प्रसन्न होतात आणि भक्तांचे सर्व संकट दूर करतात.
शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी शनिवारी हे उपाय अवश्य करावेत. हे उपाय केल्याने शनिदेव प्रसन्न होतात
त्यांची कृपा झाल्यास तुमच्या जीवनातील अडचणी दूर होतील. शनिदेवाला प्रसन्न करून तुम्ही तुमच्या नशिबाचे बंद केलेले कुलूपही उघडू शकता
जीवनात प्रगती करण्यासाठी शनिवारी पिंपळाच्या झाडाची सात वेळा प्रदक्षिणा करताना कच्च्या सुताचा धागा सात वेळा गुंडाळा. प्रदक्षिणा करताना शनिदेवाचे ध्यान करत राहावे.
शनिदेवाला पुष्पहार अर्पण करताना 'ओम श्रीं शं शनिश्चराय नमः' या मंत्राचा जप करत रहा. त्यामुळे न्यायालयातील सर्व अडचणी दूर होतील.
नोकरी मिळवण्यात यश मिळवण्यासाठी शनिवारी काळा कोळसा घेऊन वाहत्या पाण्यात टाकावा. तसेच शनिदेवाचे ध्यान करावे.