रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर इथं मुंबई -गोवा हायवेला लागूनच असलेल्या 93 वर्षे जुन्या पैसा फंड हायस्कूलमध्ये एक भन्नाट आर्ट गॅलरी पाहणं आता सहज शक्य होणार आहे.

त्यामुळे अगदी नामवंत चित्रकारांची पेंटिग्स आणि स्टोन आर्ट सारखे कलाविष्कार पाहण्यासाठी आता मुंबई, पुण्यासारख्या शहरांकडे जाण्याची गरज नाही.

लॉकडाऊनमध्ये संधी साधत संगमेश्वरमधील पैसा फंड हायस्कूलमध्ये ही गॅलरी तयार केली आहे.

या आर्ट गॅलरीमध्ये तब्बल 70 पेक्षा देखील जास्त स्टोन आर्ट आणि पेंटिग्स पाहता येतात.

याच शाळेत शिकलेल्या आणि आता ख्यातीप्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांसह जगविख्यात चित्रकार कैलासवासी अरूण पाथरे यांची पेंटिग्स देखील इथं पाहायाला मिळतात.

ग्रामीण भागात उभी राहिलेली किमान कोकणातील तरी ही पहिलीच आर्ट गॅलरी असावी.

त्यामुळे बॉम्बे आर्ट सोसायटी किंवा जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये दिसणारं चित्र, स्टोन आर्ट तुम्हाला इथं देखील पाहायाला मिळतं.

सध्या मुंबई, पुण्यातून देखील लोक इथं येत आहेत.

सध्या मुंबई, पुण्यातून देखील लोक इथं येत आहेत.

या ठिकाणी असलेल्या चित्रांची, स्टोन आर्टची किंमत साधारण 30 लाखांच्या घरात आहे.

या ठिकाणी असलेल्या चित्रांची, स्टोन आर्टची किंमत साधारण 30 लाखांच्या घरात आहे.

राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर ठसा उमठवलेल्या कलाकारांच्या हस्तकलेनं समृद्ध अशी ही गॅलरी आहे.