आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींत चढ-उतार सुरूच आहेत. आज आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चं तेल काहीसं वधारलं आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचा दर प्रति बॅरल 75 डॉलरच्या जवळ पोहोचलाय. WTI कच्च्या तेलाची किंमत 0.90 टक्क्यांनी घसरून 69.80 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचलीये. ब्रेंट क्रूड ऑईल 0.89 टक्क्यांनी वाढून 74.68 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचलंय. राष्ट्रीय पातळीवर पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये बदल झालेला नाही. देशाची राजधानी नवी दिल्लीसह महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. देशाची आर्थिक राजधानी मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये प्रति लिटर तर डिझेल 94.27 रुपये प्रति लिटरनं विकलं जातंय. पुण्यात पेट्रोल 105.98 रुपये प्रति लिटर, तर डिझेल 92.50 रुपये प्रति लिटरवर पोहोचलंय.