आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये प्रचंड उलथापालथ होत आहे. कच्च्या तेलाची मागणी जागतिक स्तरावर वाढली आहे. मात्र, सौदी अरेबिया आणि रशियाकडून कच्च्या तेलाचा हवा तसा पुरवठा केला जात नाही. त्यामुळेच कच्च्या तेलाचे दर कडाडल्याचं पाहायला मिळतंय. पण याचा परिणाम पेट्रोल-डिझेलच्या किमतींवर होणार का? देशातील महानगरांत पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर आहेत. दिल्लीत एक लिटर पेट्रोलचा दर 96.72 रुपये आणि डिझेलचा दर 89.62 रुपये आहे. आर्थिक राजधानी मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर आहे. चेन्नईत पेट्रोल 102.63 रुपये प्रति लिटर, तर डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर आहे. कोलकात्यात पेट्रोल 106.03 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर आहे.