आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये प्रचंड उलथापालथ होत आहे.



अशातच देशातील दर मात्र स्थिर आहेत.



मात्र, काही शहरांतील पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये किरकोळ बदल झाले आहेत.



राज्यस्तरीय करांमुळे वेगवेगळ्या शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये काही किरकोळ बदल पाहायला मिळतात.



देशातील महानगरांत पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर आहेत.



दिल्लीत एक लिटर पेट्रोलचा दर 96.72 रुपये आणि डिझेलचा दर 89.62 रुपये आहे.



आर्थिक राजधानी मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर आहे.



चेन्नईत पेट्रोल 102.63 रुपये प्रति लिटर, तर डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर आहे.



कोलकात्यात पेट्रोल 106.03 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर आहे.



एक वर्षाहून अधिक काळ लोटला तरीदेखील देशात पेट्रोल-डिझेलचे स्थिर आहेत.