देशातील पेट्रोल-डिझेलच्या आजच्या किमती जारी करण्यात आल्यात.

देशात आजही इंधनाचे दर स्थिरच ठेवण्यात आलेत.

आंतरराष्ट्रीय बाजारात मात्र कच्च्या तेलाच्या किमतींत चढ-उतार पाहायला मिळत आहेत.

कच्च्या तेलाच्या किमतींचा परिणाम पेट्रोल-डिझेलच्या दरांवर होण्याची शक्यता वर्तवली जातेय.

आज मात्र देशात इंधनाचे दर स्थिरच आहेत.

मात्र, काही शहरांतील पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये किरकोळ बदल झालेत.

राजधानीत एक लिटर पेट्रोलचा दर 96.72 रुपये आणि डिझेलचा दर 89.62 रुपये आहे.

आर्थिक राजधानी मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर आहे.

चेन्नईत पेट्रोल 102.63 रुपये प्रति लिटर, तर डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर आहे.

कोलकात्यात पेट्रोल 106.03 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर आहे.