आज देशातील महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलच्या दरांत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

मात्र, काही जिल्ह्यांतील पेट्रोल-डिझेलच्या दरांत किरकोळ बदल करण्यात आले आहेत.

पण तुम्हाला माहितीये देशातील प्रत्येक शहरांत पेट्रोल-डिझेलचे दर वेगवेगळे का असतात?

राज्यस्तरीय करांमुळे वेगवेगळ्या शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वेगवेगळ्या असतात.

एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन, व्हॅट जोडल्यानंतर पेट्रोल-डिझेलची किंमत मूळ किंमतीपेक्षा जवळपास दुप्पट होते

राजधानी दिल्लीत एक लिटर पेट्रोलचा दर 96.72 रुपये आणि डिझेलचा दर 89.62 रुपये आहे.

आर्थिक राजधानी मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर आहे.

चेन्नईत पेट्रोल 102.63 रुपये प्रति लिटर, तर डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर आहे.

कोलकात्यात पेट्रोल 106.03 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर आहे.

एक वर्षाहून अधिक काळ लोटला तरीदेखील देशात पेट्रोल-डिझेलचे स्थिर आहेत.

यापूर्वी सर्वात शेवटी 22 मे रोजी पेट्रोल-डिझेलच्या दरांत बदल करण्यात आलेला.