सिनेसृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार म्हणून गौरवला जाणारा 'ऑस्कर पुरस्कार' सोहळ्याकडे मनोरंजनसृष्टीसह सिनेप्रेमींचं लक्ष लागलं आहे. आज लॉस एंजेलिस येथील डॉल्बी थिएटरमध्ये 95 वा ऑस्कर पुरस्कार सोहळा पार पडणार आहे. भारतीयांना 13 मार्चला पहाटे साडे पाच वाजल्यापासून 'ऑस्कर 2023' पुरस्कार सोहळा पाहता येणार आहे. 'ऑस्कर 2023' हा पुरस्कार सोहळा प्रेक्षकांना बीसी नेटवर्क केबल, सीलिंग टीव्ही, हुलू प्लस लाइव्ह टीव्ही, यूट्यूब टीव्ही आणि फुबो टीव्हीवर पाहता येईल. तसेच ऑस्करच्या ट्विटर हॅंडलसह एबीबी माझाच्या वेबसाईवरदेखील सिनेप्रेमींना ऑस्कर पुरस्कार सोहळ्याचे सर्व अपडेट्स मिळतील. 'ऑस्कर 2023' हा पुरस्कार सोहळा जिमी किमेल होस्ट करणार आहे. 95 व्या ऑस्कर पुरस्कार सोहळा भारतासाठी खूपच खास आहे. आता भारतीयांच्या नजरा ऑस्कर पुरस्कार सोहळ्याकडे खिळल्या आहेत. 'ऑस्कर 2023'मध्ये जगभरातील अनेक सर्वोत्कृष्ट सिनेमांना नामांकन मिळालं आहे. आज लॉस एंजेलिस येथील डॉल्बी थिएटरमध्ये 95 वा ऑस्कर पुरस्कार सोहळा पार पडणार आहे.