नवरात्रीच्या पाचव्या दिवशी देवीच्या स्कंद माता रूपाची पूजा केली जाते.



हा दिवस ललिता पंचमी म्हणून ओळखला जातो. या दिवशी कुमारिका पूजन केल्याने साक्षात देवीच्या पूजेचे पुण्य मिळते.



देवीच्या स्कंदमाता रुपाची काय आहे आख्यायिका? जाणून घ्या



भगवान स्कंद लहानपणी या देवीच्या मांडीवर बसले होते. भगवान स्कंद 'कुमार कार्तिकेय' नावानेही ओळखले जातात.



स्कंदमाता चारभुजाधारी आहे. तिच्या उजव्या बाजूकडील खालील भुजा, जी वर उचललेली आहे, त्या हातात कमळाचे फूल आहे.



तसेच डावीकडील वरच्या हातात वरमुद्रा तसेच खालील भुजा वरच्या बाजुला उचललेली आहे, त्यामध्ये कमळाचे फूल आहे.



या देवीचा रंग पूर्णत: शुभ्र आहे. ही देवी कमळाच्या आसनावर विराजमान असते. यामुळे या देवीला पद्मासना असेही म्हटले जाते.



नवरात्रीतील पाचव्या दिवसाचे शास्त्रात विशेष महत्त्व सांगितले आहे. यावेळी चक्रात स्थिर झालेल्या साधकांची चित्तवृत्ती लोप पावते.



स्कंदमातेच्या उपासनेने भक्ताची इच्छा पूर्ण होते. मृत्यूलोकातच त्याला परम शांती आणि सुखाचा अनुभव मिळतो